शरद पवारांना शिवसेना संपवायची आहे; भाजप नेत्याचा दावा

CM Thackeray-Sharad Pawar-Shivaji Kardile

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डीले (Shivaji Kardile) यांनी आज राज्य सरकार आणि काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार(Sharad Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शरद पवारांना शिवसेना (Shivsena) संपवायची आहे, असा आरोपदेखील त्यांनी यावेळी केला आहे.

शरद पवार सांगतायत की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे कॅप्टन आहेत, मात्र त्यांना बाहेर फिरू दिले जात नाही. त्याच वेळी ते स्वतः मात्र या वयात सर्वत्र फिरत आहेत. शिवसेना संपवणे हा त्यामागचा एकमेव हेतू असल्याचे स्पष्ट दिसून येते. हे करत असताना राष्ट्रवादीला कशा प्रकारे ताकद मिळेल याचा प्रयत्नदेखील त्यांच्याकडून सुरू असल्याचे कर्डीले म्हणाले . हे सरकार अपयशी ठरल्याचे मी बोलत नाही तर सर्वसामान्य जनता तसं म्हणते.

हे सरकार कोरोनाला (Corona) रोखण्यात साफ अपयशी ठरलं आहे. अनेक ठिकाणी रुग्णांसाठी बेड उपलब्ध होत नाहीत, ऑक्सिजन उपलब्ध होत नाही. औषधेदेखील मिळत नाहीत. परंतु त्याच वेळी हॉस्पिटलची लाखो रुपयांची बिलं मात्र द्यावी लागतात. यावरून स्पष्ट होते की, हे सरकार अपयशी ठरले असल्याचे कर्डीले म्हणाले.

ही बातमी पण वाचा : बेस्ट अध्यक्षपदी पुन्हा शिवसेनेचाच झेंडा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER