कितीही प्रयत्न केले तरी बॉलिवूड वेगळं केले जाणार नाही; सुप्रिया सुळेंचा योगी आदित्यनाथ यांना इशारा

Supriya Sule-Yogi Adityanath

पुणे :- मुंबई आणि बॉलिवूडचं दुधात साखर विरघळते, असे नातं आहे. कितीही प्रयत्न केले तरी बॉलिवूड वेगळं केले जाणार नाही, मुंबई आणि बॉलिवूडचं दुधात साखर विरघळते, असे नातं आहे, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचे (Yogi Adityanath) मुंबईत स्वागत आहे, मात्र कितीही प्रयत्न केलेत तरी बॉलिवूड (Bollywood) वेगळं केले जाणार नसल्याचे ही राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केले आहे.

बारामती मतदान केंद्रावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे मतदानासाठी आल्या होत्या, त्यावेळी त्या बोलत होत्या. सरकार पडणार असल्याचं विरोधक म्हणत असल्याचं विचारलं असता त्या म्हणाल्या, संघटना आणि कार्यकर्ते नीट ठेवण्यासाठी त्यांना असं बोलावं लागतं, त्यांना सरकारविरोधात बोलण्यासारखं काहीच नाही म्हणून सरकार पडणार असं बोलतायत, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येत्या 2 डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बॉलिवूड निर्मात्यांशी तसेच उद्योजकांशी चर्चा करणार आहेत.

दरम्यान योगी आदित्यनाथ 1 डिसेंबर रोजी मुंबईला येण्यासाठी उत्तर प्रदेशमधून रवाना होतील. ते 1 डिसेंबरच्या रात्री मुंबईत पोहोचतील.

ही बातमी पण वाचा : विरोधकांकडून रडीचा डाव, माझ्या नावाचा गैरवापर करत प्रचार, सुप्रिया सुळेंचा आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER