राष्ट्रवादी भाषणापुरता नाही, तर कृती करणारा पक्ष : सुप्रिया सुळे

- प्रिया पाटील ‘एलजीबीटी’ सेलच्या राज्यप्रमुख

NCP Supriya Sule

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) असा पक्ष आहे, ज्याने युवती संघटना स्थापन केली आणि आता ‘एलजीबीटी’ सेलची (LGBT cell) स्थापना करत आहे. देशातील असा पहिला पक्ष आहे. जो भाषणापुरता नाही, तर कृती करणारा पक्ष आहे. मिशन मोडमध्ये वेल्फेअर बोर्ड सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आला आहे, असे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे . राष्ट्रवादी काँग्रेसने आज देशातील पहिल्या ‘एलजीबीटी सेल’ स्थापन केली. या सेलच्या राज्य अध्यक्षपदी प्रिया पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी त्या बोलत होत्या .

राष्ट्रवादीने देशात पहिल्यांदा युवती संघटनेचा प्रयोग केला आणि आता ‘एलजीबीटी सेल’ स्थापन करुन या वंचित समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे,” असं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. “समाजात एलजीबीटी लोक चौकटीत यायला बघत असतात. त्यांना समान वागणूक दिली पाहिजे. याचा विचार राष्ट्रवादीने केला आहे, शिवाय राष्ट्रवादीने निवडणूक काळात जाहीर केलेल्या जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे पाऊल टाकले आहे. एलजीबीटी सेलची आज स्थापना झाली असून, प्रिया पाटील आणि त्यांच्यासोबत काम करणारे १४ जण प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या खात्यांतर्गत एलजीबीटी वेल्फेअर बोर्डसाठी प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातून योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, शिवाय आम्ही निवडणूक काळात जाहीरनाम्यात जे काही जाहीर केले आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे,” असे जयंत पाटील यावेळी बोलताना म्हणाले.

एलजीबीटी’ सेल ची कार्यकारणी ;
उपाध्यक्ष अनिता वाडेकर, जनरल सेक्रेटरी – माधुरी सरोदे – शर्मा, स्नेहल कांबळे, सेक्रेटरी – उर्मी जाधव, सुबोध कासारे, कोषाध्यक्ष – सावियो मास्करीनास, सदस्य – अभिजित ठाकूर, प्रियुष दळवी, श्रेयांक आजमेरा, साहिल शेख, साध्य पवार, रोहन पुजारी, दिव्या लक्ष्मनन आदी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER