शरद पवार पश्चिम बंगालच्या रणसंग्रामात उतरणार ; काँग्रेसचा ‘तो’ प्रस्ताव नाकारला

Maharashtra Today

मुंबई : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वात चुरशीची लढत असणाऱ्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत प्रचार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad-pawar-will-campaign-in-west-bengal-election-2021) मैदानात उतरणार आहेत.

शरद पवार लवकरच बंगालच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 1 एप्रिलपासून तीन दिवसांसाठी ते बंगालमध्ये फिरून प्रचार करतील. मात्र, ते तृणमूल काँग्रेसच्या व्यासपीठावरून प्रचार करणार का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु, शरद पवार यांनी तृणमूल काँग्रेससाठी (TMC) प्रचार केल्यास ममता बॅनर्जी यांना फायदा मिळू शकतो. मात्र काँग्रेस पक्षासाठी हा धक्का ठरेल.

काँग्रेस नेते प्रदीप भट्टाचार्य यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांना पत्र लिहून बंगालमध्ये प्रचाराला येऊ नये, अशी विनंती केली होती. ‘राजद’चे नेते तेजस्वी यादव यांनाही काँग्रेसकडून असेच पत्र पाठवण्यात आले होते. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचा लढा हा सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाशी आहे. तुमच्यासारखे स्टार प्रचारक तृणमूल काँग्रेसच्या व्यासपीठावर गेले तर सामान्य मतदारांच्या मनातील संभ्रम वाढेल. त्यामुळे आपण तृणमूल काँग्रेसच्या प्रचारात ममता बॅनर्जी यांच्या बाजूने उतरू नये, असे भट्टाचार्य यांनी पत्रात म्हटले होते. मात्र, शरद पवार यांनी काँग्रेसची ही विनंती अमान्य केली आहे .

ममता बॅनर्जी यांच्यासाठी पश्चिम बंगालची लढाई कधी नव्हे इतकी अटीतटीची झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचासारखा खंदा नेता आणि भाजपच्या अवाढव्य प्रचारयंत्रणेचा सामना करण्यासाठी ममता बॅनर्जी यांना राष्ट्रीय स्तरावरील मोदीविरोधकांची साथ मिळण्याची गरज आहे. त्यासाठी भाजपला कात्रजचा घाट दाखवणाऱ्या शरद पवार यांच्यासारख्या नेत्याचा ममता बॅनर्जी यांना प्रचारात फायदा होऊ शकतो.

ही बातमी पण वाचा : शरद पवारांनीच युपीएचे नेतृत्व करावे हे अनेक अनेक पक्षांना मान्य ; संजय राऊतांचे विधान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER