
मुंबई :- कोकणातील नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प हा राज्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. हा प्रकल्प राज्याबाहेर जाऊन देऊ नका, असे पत्र मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शरद पवार यांना पाठवले होते. हे पत्र वाचल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केल्याची माहिती आहे .
या चर्चेदरम्यान शरद पवार यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन केल्याची माहिती राज ठाकरे यांनी सोमवारी कृष्णकुंजवर जमलेल्या नाणार प्रकल्प समर्थकांना ही माहिती दिली.
मी नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी बोलेन, असे शरद पवार यांनी सांगितल्याचा खुलासा राज ठाकरे यांनी केला. त्यामुळे आता नाणार प्रकल्पाविषयीच्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने बासनात गुंडाळलेल्या या प्रकल्पाची फाईल पुन्हा उघडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .
दरम्यान नाणार प्रकल्प समर्थकांनी सोमवारी राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.
ही बातमी पण वाचा : नाणारबाबत राज यांच्या भूमिकेचं स्वागत, योग्य वेळी सेनेचे नेतेही समर्थन करतील – फडणवीस
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला