
मुंबई : मुंबईच्या माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपांवरून महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे मत महाराष्ट्राचे मंत्री आणि राज्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी कठोर भूमिका घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेलं पत्र ही त्यांची प्रतिक्रिया आहे. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही. दरम्यान काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घराच्या बाहेर बॉम्ब असलेली गाडी आणि सोबत एक धमकीपत्रसुद्धा सापडले होते. या प्रकरणी सचिन वाझे यांना राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) अटक केल्यानंतर काही दिवसांनी हा मोठा बदल झाला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला