भाजपसोबत राष्ट्रवादीचे सख्य? जयंत पाटील म्हणाले…

Jayant Patil

मुंबई :- गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यात अहमदाबादमध्ये झालेल्या कथित भेटीच्या चर्चेवर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाष्य केले . ‘राष्ट्रवादी काँग्रेस कधीही भाजपच्या जवळ जाणार नाही. आमची आणि त्यांची विचारसरणी वेगवेगळी आहे. दोहोंमध्ये सख्य अशक्य आहे,’ असेही ते म्हणाले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्या नजरचुकीच्या निर्णयावरही पाटील यांनी सडकून टीका केली.

‘आमचे नेते शरद पवार यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) स्थापन केली. ही आघाडी भक्कम असून, नव्या राजकीय समीकरणात काडीचेही तथ्य नाही. भाजपला करोना साथरोगाचे काही पडलेले नाही. काही झाले तरी सत्तेत कसे यावे याकडे त्यांचे लक्ष आहे,’ असे जयंत पाटील म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल शंका निर्माण करण्याचे काम होत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीनही पक्ष महाविकास आघाडीत एकत्र काम करत असून, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. ज्यांना आमच्या खुर्चीवर बसायचे आहे, त्या शक्ती हा प्रयत्न करत आहेत, असे जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान केंद्राच्या व्याजदरकपातीचा निर्णय १२ तासांत मागे घेण्यात आला. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत राजकीय फटका बसेल, या भीतीने केंद्राने हा निर्णय मागे घेतला, असा आरोपही पाटील यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button