… हे तर ‘आयत्या बिळावर चंदूबा : राष्ट्रवादीचा चंद्रकांत पाटलांना चिमटा

Sharad Pawar-,Chandrakant Patil

पुणे : कोथरूड मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या चंद्रकांत पाटील यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या ट्विटर हँडलवरून मराठी म्हणीचे नवे अर्थ या मथळ्याखाली एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधत ते पाटील जे करत आहेत ते म्हणजे आयत्या बिळावर चंदूबा असल्याचं म्हटलं आहे.

ही बातमी पण वाचा:- कुस्ती पैलवानांसोबत लढायची असते, लहान मुलांशी नाही – शरद पवार

पुण्याच्या कोथरूडमध्ये भाजपने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देऊन तेथील भाजपच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलले आहे. त्यामुळे मतदारसंघातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

एवढेच नाही तर आमदार मेधा कुलकर्णी यांच्या समर्थकांनी चंद्रकांत पाटील यांना कडाडून विरोध केला आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघात ठिकठिकाणी ‘१०० % नोटाला मतदान करा’ असे काळ्या रंगाचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघातून जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. चंद्रकांत पाटलांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मतदारसंघात बंडाचे वारे वाहू लागले होते.

दरम्यान कोथरूड मतदारसंघातून पातिल यांचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं मनसेला पाठिंबा जाहीर केला होता. विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही चंद्रकांत पाटील यांना चंपा म्हणत त्यांची फिरकी घेतली होती. निवडणुकीत आमचा अजय ‘चंपा’ ची चंपी करणार असं म्हणत राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता.