दगडात देव मानणारा नेता कुठं अन् रयतेलाच देव मानणारा नेता कुठं- राष्ट्रवादी काँग्रेस

Sharad Pawar-Modi

मुंबई : सातव्या टप्प्याच्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी उत्तराखंडच्या केदारनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर ते केदरानाथजवळील एका गुहेमध्ये ध्यानाला बसले होते. मोदी स्वत: दोन किलोमीटर पायी चालत गुहेपर्यंत गेले. त्यांच्या या ध्यानसाधनेवर राष्ट्रवादी काँग्रेसने निशाणा साधला आहे.

निवडणूक प्रचाराचा थकवा दूर करायला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथच्या गुहेत जाऊन बसले अन् पवार साहेब मतदान केल्यावर क्षणाचाही विलंब न लावता दुष्काळग्रस्त गावांच्या दौऱ्यावर धावून गेले, असा टोला राष्ट्रवादीने मोदींना लगावला. दगडात देव मानणारा नेता कुठं अन् रयतेलाच देव मानणारा आमचा नेता कुठं, असेही राष्ट्रवादीने आपल्या अधिकृत ट्विटरवर  म्हटले.

ध्यानसाधना एकांतात करायची असते; मात्र ती करताना मोदींना तिथंसुद्धा फोटोग्राफर लागतो, अशा शब्दांत  अनेकांनी मोदींवर टीकास्त्र सोडले आहे.

ही बातमी पण वाचा : राजकीय हालचालींना वेग ; चंद्राबाबू नायडूंनी घेतली शरद पवारांची भेट