पुणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र, संजय राऊतांची मोठी घोषणा

Pune Municipal Elections - NCP - Shiv Sena

पुणे : शिवेसना (Shiv Sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुणे महापालिका निवडणुकीबाबत मोठे विधान केले आहे. राऊत यांनी पुण्यात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढतील, अशी मोठी घोषणा पत्रकार परिषदेत केली. पुणे महापालिकेत सध्या भाजप (BJP) सत्तेत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुणे महापालिका निवडणूक एकत्रितपणे लढणार आहे. तर, काँग्रेसला (Congress) सोबत घेण्याचा विचार असल्याचंही राऊत यांनी स्पष्ट केलं.

एकत्र लढणं हे सत्ता परिवर्तनाच्या दिशेने टाकेलेले पाऊल असंत. राज्यात होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढाव्यात, यासाठी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) पक्षांमध्ये प्रयत्न सुरु आहेत. पुणे, पिंपरी- चिंचवड अशा काही महापालिका आहेत, जिथे राष्ट्रवादीची ताकद शिवसेनेपेक्षा जास्त आहे. तिथे पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये निवडणुका एकत्र कशा लढायच्या, या बद्दल अजित पवारांबरोबर चर्चा करु. एकत्र निवडणुकूच लढलो तर निश्चित सत्ता परिवर्तनाच्या दिशेने सुरुवात होईल असे संजय राऊत यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER