पुणे महापालिका निवडणूक; राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा, शिवसेनेची 80 जागांची मागणी , भाजपनेही कंबर कसली

पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकांसाठी (Pune Municipal Election) सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे . 2022 मध्ये पुणे महापालिकेची निवडणूक पार पडणार आहे. मात्र, आतापासूनच सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केल्याचे पाहायला मिळतंय. शिवसेनेकडून (Shivsena) जागाचं गणित मांडण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिकेवर स्वबळावर झेंडा फडकवण्याचा निर्धार केला . तर भाजपने खासदार गिरीश बापट यांच्या खांद्यावर जवाबदारी सोपविली आहे .

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर वेगळेच गणितच मांडले आहे. पुणे महानगरपालिकेची निवडणूक महाविकासआघाडीने एकत्र लढवली तरी शिवसेना 80 जागांवर लढेल, अशी घोषणा संजय राऊत यांनी केली .

तर दुसरीकडे महापालिका निवडणूक ही खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखालीच लढवल्या जातील, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे . महापालिका निवडणुकीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवणार, असा निर्धार राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्षाच्या वर्धापन दिनी केला.

हे पाहता 2022 मधील पुणे महापालिका निवडणूक अधिक रंगतदार होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button