एनडीएतून बाहेर पडलेल्या ‘शिरोमणी अकाली दल’चे शरद पवारांनी केले स्वागत

नवी दिल्ली: मोदी सरकारच्या (Modi Govt) प्रस्तावित तीन कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी (Farmers) रोष व्यक्त केला होता. या विधेयकांवरून मतभेद झाल्यानं पंजाबमधील प्रमुख पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलानं मोदींच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर एनडीएमधूनही (NDA) शिरोमणी अकाली दल बाहेर पडला.

अकाली दलाच्या मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या राजीनाम्यानंतर अकाली दल पक्षानेही गेल्या अनेक वर्षांची मैत्री तोडून एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे अकाली दल एनडीएतून बाहेर पडला आहे.

त्यांच्या या निर्णयाचे महाराष्ट्रातील मोठे नेते राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी त्यांचे स्वागत केले आहे.ट्विट करून शरद पवार यांनी अकाली दलाचे स्वागत केले व शुभेच्छा दिल्या आहेत.

अकाली दल चे अध्यक्ष आणि खासदार हरसिमरतबादल यांचे , सुखबीरसिंग बादल यांचे अभिनंदन. श्री प्रकाशसिंग बादल यांनी शेतकरी बिलांच्या निषेधार्थ एनडीएबाहेर पडले शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल धन्यवाद! असे ट्विट पवार यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER