ज्या मुद्द्यावरून वाद आहेत त्यापासून दूर राहणं हेच शहाणपणाचे ; राम मंदिर मुद्द्यावरुन शरद पवारांचा राज्यपालांना टोला

Sharad Pawar & Governor Bhagat Singh Koshyari

मुंबई : अयोध्येतील राम जन्मभूमीच्या मंदिर उभारणीसाठी निधी संकलनाच्या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उपस्थित राहणार आहेत. नागपुरातील पोद्दारेश्वर राम मंदिरात 15 जानेवारीला हा कार्यक्रम पार पडणार आहे. घटनात्मक पदावर असताना अशा कार्यक्रमांना उपस्थित राहणं कितपत योग्य आहे?, याची चर्चा सध्या राज्यभर सुरु आहे. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी याचप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांना टोला लगावला.

राज्याचे राज्यपाल हे सर्वांचे आहेत. ते राज्याचे प्रशासकीय प्रमुख आहेत. ज्या प्रश्नाबाबत लोकांमध्ये उलटसुलट चर्चा होते त्यावेळी अशा प्रश्नांपासून दूर राहण्याचं काम शहाणपणाचे आहे असे मला वाटते , असा सणसणीत टोला शरद पवार यांनी राज्यपालांना लगावला.

दरम्यान राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपानंतर राज्यात वादळ उठलं आहे. धनंजय मुंडे यांनी नैतिकतेला स्मरुन राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी सध्या विरोधी पक्ष करत आहेत. तसंच राष्ट्रवादीच्याही वरिष्ठ नेत्यांमध्ये याचप्रकरणी चर्चा सुरु आहे . याचविषयी सविस्तर बोलण्यासाठी पवार माध्यमांसमोर आले. यावेळी पत्रकारांनी राज्यपालांवर प्रश्न विचारला असता त्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER