फुले, आंबेडकर जयंतीला अंधश्रेद्धेचा पुरस्कार न करता ज्ञानाचा दिवा लावू या; शरद पवारांचा मोदींना टोला

ncp-sharad-pawar-speeach-corona-issue criticise PM Modi

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदपवार यांनी आज तिसऱ्यांदा फेसबुक लाईव्हवरून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भारतात कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावर चिंता व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिवे लावणाच्या आवाहनाला लक्ष करत अप्रत्येक्ष टोला लगावला. आज कोरोनामुळे इतर देशांची परिस्थिती भारतापेक्षा चांगली नाही.

भारतात चिकित्सीय पद्धतीमुळे कोरोना नियंत्रणात येईल. अंधश्रद्धेमुळे कोरोनाबरा होणारा नाही. त्यामुळे ज्ञानाचा प्रसार करणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी ज्ञानाचा दिवा आणि १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला संविधानाच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करत दिवा लावू या, असे आवाहन करत त्यांनी मोदींना टोला लगावला.

यावेळी त्यांनी दिल्लीतील तबलिगी समाजाच्या कार्यक्रमावर भाष्य करत कह्णत व्यक्त केली. दिल्लीमधील निझामुद्दीन येथे पार पडलेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला परवानगी देण्याची अजिबात गरज नव्हती. तसेच वारंवार टीव्हीवर यासंबंधी बातम्या दाखवून सांप्रदायिक कलह वाढेल अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे. देशात संशय, कटुता निर्माण करणाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याने चालणार नाही दिल्लीतील मरकजच्या बातम्या वारंवार टिव्हीवर दाखवण्याची गरज आहे का?, व्हॉटसअ‌ॅपवरून व्हायरल होणारे पाचपैकी चार मेसेज हे खोटे आहेत. खोटे मेसेज लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात. आणि वास्तव पुढं आलं तर वारंवार त्याची मांडणी करुन त्याबद्दल एक प्रकारचा गैरसमज निर्माण केला जात आहे. हे कुणी मुद्दामून करत आहे का याबद्दल शंका वाटते, असेही पवार यावेळी म्हणाले.

शरद पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या सूचनांचं योग्य पालन करा असं आवाहन केलं. शरद पवारांनी यावेळी बोलताना सांगितलं की, “सध्याच्या घडीला देशात ४०६७ करोनाच्या केसेस आहेत. तसंच ११८ मृत्यू झाले आहेत. ३२८ रुग्ण बरे होऊन घऱी गेले आहेत. हे प्रमाण दुर्लक्ष करण्यासारखं नाही. करोनाचा रुग्ण बरा होऊ शकतो ही स्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे सूचनांचं पालन केलं पाहिजे. ही आजची गरज आहे”. असे आवाहन त्यांनी केले.

कोरोनाच्या लढाईत सोबत, मात्र मोदींच्या आवाहनाला शरद पवारांचा नकार