कंगनाप्रकरणाशी महाविकास आघाडीचा संबंध नाही : शरद पवार

Sharad Pawar & Kangana Ranaut

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) प्रकरणाशी महाविकास आघाडीचा संबंध नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले आहे . दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कंगनाप्रकरणाशी सरकारचा काही संबंध नसून कार्यालयावर मुंबई महापालिकेने कारवाई केली आहे, असे  सांगताना शरद पवारांनी शिवसेनेच्या भूमिकेवर बोलण्यास नकार दिला.

“कंगनाच्या कार्यालयावर कारवाई मुंबई महापालिकेने केली आहे. महापालिकेचे काही नियम असून त्यानुसार ते कारवाई करत असतात. कारवाईचा निर्णय सरकारचा नाही तर पालिकेचा आहे. सर्व जबाबदारी पालिकेची आहे.” असे शरद पवार यांनी सांगितले आहे. दरम्यान शिवसेना (Shivsena) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना प्रत्युत्तर देताना अभिनेत्री कंगना रणौत हिनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. या वक्त्यव्यानंतर चांगलाच वाद निर्माण झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER