शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मिशन २०२४ तर काँग्रेसने मांडली वेगळी भूमिका; महाविकास आघाडीत मतभेद ?

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. राज्यातील राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Shard Pawar)- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची भेट झाल्यानंतर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार चालवताना येणाऱ्या समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी पवारांसमोर नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.

यावरून महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे चालेल आणि आगामी २०२४ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र लढतील आणि जिंकतील असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. मात्र शरद पवारांच्या या विधानानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वेगळीच भूमिका मांडली आहे. पुढील लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही स्वबळावर लढण्याची तयारी करत आहोत. आमच्या मित्रपक्षाचे काय प्लॅनिंग आहे याबद्दल कल्पना नाही, असेही पाटोले म्हणाले होते . काँग्रेसच्या या भूमिकेवरून महाविकास आघाडीत मतभेद असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button