
मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांनी आज पुन्हा एकदा माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली . जोपर्यंत आरोपांमधील सत्यता समोर येत नाही, तोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार नाही, अशी भूमिका घेत मुंबई पोलिसांवर आमचा संपूर्ण विश्वास आहे. ते या प्रकरणाचा योग्य तपास करतील, असे शरद पवार म्हणाले.
“गुन्हा दाखल करण्याचं काम पोलिसांचं आहे. पोलिसांनी खोलात जाऊन तपास करावा. मुंबई पोलिसांवर आमचा संपूर्णपणे विश्वास आहे. मुंबई पोलिस मुंडे प्रकरणाचा योग्य तपास करतील”, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
“सत्य जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत मुंडे यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही. सत्य बाहेर आल्यावर निर्णय घेता येईल. आरोप झाल्यावर संयम ठेवावा लागतो. सत्यता बाहेर येईपर्यंत थांबावे लागते , असे सांगताना आरोप झाल्याझाल्या जर लगेचच राजीनामा घेतला गेला तर चुकीचा पायंडा पडेल”, अशी भीती पवारांनी व्यक्त केली.
ही बातमी पण वाचा : धनंजय मुंडेंसाठी देवेंद्र फडणवीसांची ढाल; शरद पवारांकडून दाखला देत भाजपची कोंडी
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला