राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्याकडून सात हजार गरजूंना घरपोच अन्न-धान्य

Sangram Jagtap

अहमदनगर : लॉकडाऊनच्या काळात सर्व पक्षांच्या नेत्यांनी गरजूंसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांनीही मदतकार्यात आपला सहभाग नोंदवला आहे. नगरमधील सात हजार गरजू कुटुंबांना त्यांनी घरपोच किराणा माल दिला आहे.

आमदार जगताप यांनी प्रेरणा प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे मदतकार्य केले आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीमुळे गरजू गरिबांना अन्न-धान्य पुरवण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था, राजकीय नेते पुढे सरसावले आहेत. गरिबांची उपासमार होऊ नये व कोरोनाचे युद्ध जिंकता यावे यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार युद्धस्तरावर प्रयत्न करत आहेत. सरकारकडूनही गरजूंना मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सलमान खानचा दिलदारपणा, फिल्म इंडस्ट्रितील 16 हजार कामगारांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा