राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर याना कार्यालय पेटवून देण्याची धमकी

Rupali Chakankar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांचे कार्यालय पेटवून देण्याचा धमकीचा फोन आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयंत रामचंद्र पाटील या व्यक्तीनं रुपाली चाकणकर यांना कार्यालयात तोडफोट करुन पेटवून देण्याची धमकी दिली आहे. जयंत पाटील (Jayant patil) हे सांगलीतील तांबवे येथील रहिवाशी आहेत.

पुण्यातील धायरी भागात राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. शुक्रवारी सायंकाळी सव्वा पाच वाजता त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात एका इसमाचा फोन आला असता चाकणकर यांचे स्वीय सहाय्यक राजदीप कठाळे यांनी तो उचलला. सदर व्यक्तीनं फोन करुन कार्यालय पेटवून देतो अशी धमकी दिली. धमकीचा फोन आला तेव्हा रुपाली चाकणकर कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्या माघारी परतल्यानंतर सदर घडलेला प्रकार स्वीय सहाय्यक राजदीप कठाळे यांनी रुपाली चाकणकर यांना सांगितला.

त्यानंतर चाकणकर यांनी सरळ सिंहगड रस्ता पोलीस स्टेशन गाठलं. सदर व्यक्ती विरोधात तक्रार दिली. तक्रारीच्या आधारावर सिंहगड पोलिसांनी सदर व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ज्या कुणी अनोळखी व्यक्तीने फोन करून अशा पद्धतीने भाषा वापरून धमकीचा फोन केला आहे. त्याच्याविरोधात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस योग्य तो तपास करतील, न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. असे चाकणकर यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER