कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीच्या ‘ या’ आमदाराचे वर्चस्व

कर्जत : कर्जत तालुक्यातील (Karjat taluka) पार पडलेल्या एकूण ५६ ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांचाच बोलबाला असल्याचे सिद्ध झाले .५६ ग्रामपंचायतींपैकी तब्बल ४७ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) झेंडा लावत आमदार पवार यांनी माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांना धक्का दिला आहे, असा दावा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे यांनी केला आहे.

राज्यात नुकत्याच विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्या, त्यात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आता तीच परिस्थिती ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पाहायला मिळाली आहे. आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) मतदार संघात असलेल्या अनेक प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडत न्याय मिळवून दिला. कुकडी-सिनाचा पाणीप्रश्न, बस डेपो, भू-संपादन, रखडलेला पीक विमा आदी मोठय़ा प्रश्नांची सोडवणूक करत आपल्या प्रयत्नाने आणि पाठपुराव्यातून शेतकरी व नागरिकांना न्याय मिळवून दिला, असेही शेवटी नितीन धांडे यांनी सांगितले.

निवडणुकांचे निकाल लागताच राम शिंदे यांनी केलेला दावाही आता मोडीत निघाला आहे. तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आणि सर्वाचे लक्ष कर्जत-जामखेड मतदार संघाकडे लागून राहिले. भाजपाचे माजी मंत्री असलेल्या राम शिंदे यांना आमदार रोहित पवार हे सर्वाधिक ग्रामपंचायती आपल्या ताब्यात घेत शह देणार का? अशी मतांतरे व्यक्त केली जात होती. ग्रामपंचायत आपल्या ताब्यात असणे ही मोठी राजकीय इभ्रत लोकप्रनिधींना असतेच. त्यातच स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या ग्रामपंचायतींना सर्वाधिक निधी मिळत असल्याने स्थानिक विकासात ग्रामपंचायतींचा मोठा वाटा असतो. त्यामुळे माजी मंत्री राम शिंदे आणि आ. रोहित पवार यांच्यातच अप्रत्यक्ष रीत्या ही निवडणूक होती. त्यामुळे मोठी रस्सीखेच करत आ. रोहित पवारांनी माजी मंत्री राम शिंदे यांच्या ताब्यात असलेली सत्तास्थाने हळूहळू काबीज करत आपला बालेकिल्ला आणखी प्रबळ आणि घट्ट करण्यास सुरुवात केली आहे, असे धांडे म्हणाले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER