राष्ट्रवादीला लाॅटरी; सत्तेत आल्यापासून देणग्यांमध्ये इतक्या पटींची वाढ!

Sharad Pawar - NCP

मुंबई : शिवसेना , काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले . सत्तास्थापनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळणाऱ्या देणगीमध्ये पाच पटीने वाढ झाली आहे. विशेष म्हणजे देणगीदारांमध्ये भाजप आमदाराच्या कंपनीचंही नाव असल्याने आणखी चर्चांना उधान आले आहे. सर्वच राजकिय पक्षांना मिळणाऱ्या देणगीची रक्कम ही दोन लाखांच्या पूढे गेल्यास त्याची माहिती निवडणुक आयोगाला देणं बंधनकारक आहे.

2019-2020 या आर्थिक वर्षात मिळालेल्या देणगीची माहिती राष्ट्रवादीने जाहीर केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 2019-2020 या वर्षात तब्बल 59.94 कोटी रूपये देणगी मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे. मागच्या वर्षी हीच रक्कम 12.05 कोटी रूपये एवढी होती.

या सर्व प्रकाराबद्दल मंगल प्रभात लोढा यांना विचारणा केली असता कंपनी माझ्या मालकीची आहे पण मी प्रत्यक्षरित्या ती सांभाळत नसून कंपनीच्या कार्यालयात याबाबत विचारण्याचे सांगण्यात आले आहे. या गोष्टीमूळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात देणगीमध्ये वाढ झाल्याने राष्ट्रवादीला लाॅटरी लागल्याचं चित्र दिसत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे भारतीय जनता पक्ष मुंबईचे प्रमुख आणि आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या मालकीच्या लोढा डेव्हलपर्स या कंपनीने 5 कोटी रूपयांची देणगी राष्ट्रवादीला दिली आहे. त्यामुळे, गतवर्षीपेक्षा यावर्षी मिळालेल्या देणगीत पाच पटीने वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

ही बातमी पण वाचा : 105 आमदारांना विरोधी पक्षात बसवणाऱ्या पवारांच्या राजकीय कारकिर्दीला आज 54 वर्ष पूर्ण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER