राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का ; आणखी एक नेता रामराम ठोकण्याच्या तयारीत

Rajesh Bhor

मुंबई : राज्यात तीन पक्षांचे सरकार स्थापन झाले असले तरी महाविकास आघाडीमध्ये स्थानिक पातळीवर बिघाडी पाहायला मिळत आहे . नवी मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे म्हटले जात आहे.

महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना ही नाराजी आता समोर येतेय. येथील राष्ट्रवादी (NCP) काँग्रेस पार्टीचे युवक जिल्हाध्यक्ष राजेश भोर (Rajesh Bhor) पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत.

राज्यात कोल्हापूर, औरंगाबाद, मुंबई, नाशिक, वसई विरार तसेच नवी मुंबई या महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. कधीही निवडणुकीची घोषणा होऊ शकते. या पार्श्वभूमीवर राज्यात नेत्यांनी राजकीय गणितं आखायला सुरुवात झाली आहे. राज्यात राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केलं असलं तरी, स्थानिक पातळीत परिस्थिती नाजूक आहे. विशेषत: नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. येथे युवक राष्ट्रवादीचे 70 % कार्यकर्ते नवी मुंबईतील नेत्यांवर नाराज असल्याचं सांगण्यात येते .

भोर यांना याविषयी विचारले असता, त्यांनी पक्षाबाबत असलेली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली आहे. राष्ट्रवादीमध्ये निष्ठावंतांवर अन्याय होत आहे. महापालिकेसाठी जागावाटप करताना मोठा घोळ करण्यात आला, असे भोर यांनी म्हटले . तसेच पक्षात सुरू असलेली गटबाजी आणि होत असलेली राजकीय कुचंबना याला कंटाळून ते पक्ष सोडण्याचा निर्णय घेणार आहेत, असे म्हटले जाते .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER