राष्ट्रवादी काँग्रेसने फलक लावून मानले मोदी सरकारचे आभार ! कशासाठी ?

- NCP puts up placards and thanks Modi government! For what

चंद्रपूर : भारतीय जनता पार्टीची(BJP) सत्ता असलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेच्या इमारतीसमोर व शहरात सर्वत्र “थँक्यू मोदी सरकार”… (Thankyou Modi Govt )चे लागलेले उपहासात्मक फलक सध्या चर्चेत आहेत. चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) या फलकावर पेट्रोलची शंभरी, खड्ड्यात गेलेला शेअर बाजार, बेरोजगारी व आकाशाला भिडलेल्या महागाईचा उल्लेख केला आहे.

इंधन व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईच्या भडक्यामुळे मोदी सरकार टीकेच्या केंद्रस्थानी आहे. मागील सहा वर्षात महागाईचा भडका उडला आहे. एक लिटर पेट्रोलसाठी १०० रूपये मोजावे लागत आहेत तर, डिझेल ९० रूपये लिटरपर्यंत पोहचले आहे. त्याचा थेट परिणाम दळणवळणावर झाला. भाजीपाला – धान्य खाद्य तेल या सर्व जीवनावश्यक वस्तुंच्या किंमतीत भरमसाठ वाढ झाली.

उल्लेखनीय म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्य तेल व पेट्रोलच्या किंमती कमी असताना भारतात मात्र पेट्रोल, डिझल व खाद्य तेल सर्वाधिक महाग झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER