राष्ट्रवादी आक्रमक; गॅस, इंधन दरवाढीविरोधात आज राज्यभर ‘चूल मांडा’ आंदोलन

मुंबई : राष्ट्रवादी (NCP) महिला काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात आवाज उठविला आहे . गॅस आणि पेट्रोल-डिझेलच्या (petrol-diesel-and-gas) किमती गगनाला (price-increase) भिडत असल्यामुळे राज्यातील जनता त्रस्त आहे. काही शहरांत पेट्रोलच्या दरांनी शंभरी पार केल्यामुळे सामान्य वर्गातील अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे . राष्ट्रवादी (NCP) महिला काँग्रेसतर्फे पेट्रोल दरवाढीविरोधात आज चूल मांडा आंदोलन केला जाणार आहे.

राज्यातील ज्या-ज्या पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहिरात असेल, त्या सर्व पेट्रोल पंपांवर राष्ट्रवादीतर्फे हे आंदोलन केले जाईल. आज सकाळी 11 वाजता या आंदोलनाची सुरुवात होईल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.

राज्यात तसेच देशात पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. अनेक शहरांत पेट्रोलने शंभरी पार केल्यामुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. कित्येकांना स्व:तच्या खासगी वाहनाने प्रवास करणे जिकरीचे झाले आहे. मागील काही दिवसांपासून गॅस सिलिंडरचे भावही दिवसेंदिवस वाढत आहेत. फक्त फेब्रुवारीमध्ये तीन वेळा गॅसचे भाव वाढल्यामुळे गृहिणी त्रस्त आहेत. परिणामी नागरिकांकडून केंद्र सरकारविरोधात रोष व्यक्त केला जातोय. याच कारणामुळे राष्ट्रावादीने आज राज्यभरात चूल मांडा आंदोलनाचे आयोजन केले आहे. आज सकाळी 11 वाजता या आंदोलनाला सुरुवात होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER