शरद पवारांच्या एका फोनची जादू ; महिला डॉक्टरांनी मानले आभार

Sharad Pawar-Aarti Udgirkar

पुणे : देशासह राज्यात कोरोनाची (Corona) स्थिती गंभीर आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करणा-या डॉक्टरदेखील कोरोनाबाधित झाल्या आहेत. कोरोनाने नातेवाईक, भेटीगाठी दुरावले आहेत. कोरोनाच्या सावटाखालीच अनेक सण – उत्सव घरच्या घरी साजरे होत आहेत. नुकताच झालेला रक्षाबंधनाचा सण. बहीण भावाला राखी बांधण्याचा, हा बहीणभावाच्या प्रेमाचा उत्सव.

 मात्र, कोरोनाने यंदा अनेक बहीणभावांची ताटातूट केली आणि अनेकांनी ऑनलाईन रक्षाबंधन साजरे केले. अशाच एक महिला डॉक्टर ज्या सध्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये (वायसीएम) कोरोना उपचारासाठी दाखल झाल्या आहेत. डॉ. आरती उदगीरकर (Dr. Aarti Udgirkar) यांच्या प्रकृतीची राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी सहानुभूतिपूर्वक विचारपूस केल्याने त्यांना मोठा धीर मिळाला असून त्यांनी शरद पवार यांचे आभार मानले आहेत. शरद पवार (Sharad pawar) यांनी डॉ. आरती यांचे वडील नरसिंगराव उदगीरकर यांच्याशी संवाद साधून वायसीएम रुग्णालयात तिच्यावर सुरू असलेल्या उपचाराबद्दल जाणून घेतले. शरद पवार म्हणाले, ‘वायसीएमच्या डॉक्टरांसोबत माझे बोलणे झाले आहे.

डॉ. आरती यांना विश्रांती घ्यावी लागेल. पुरेशा उपचारासाठी दोन ते तीन आठवडे लागतील. काळजी करण्याचे कारण नाही. धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड हेदेखील उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत आणि १५ दिवसांनी कामालाही लागले. आरती यांच्यासाठी दवाखान्यात उत्तम औषधे व इंजेक्शनची व्यवस्था आहे. आरतीच्या तब्येतीमध्ये झालेली सुधारणाही डॉक्टर मला कळवीत असल्याचे सांगत शरद पवार यांनी सध्या लातूर येथे असलेले आरतीचे वडील नरसिंहराव उदगीरकर यांना धीर दिला.
(साभार सकाळ)

ह्या बातम्या पण वाचा : 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER