संकटमोचक शरद पवार झाले अलर्ट ; राष्ट्रवादीच्या शिलेदारांची बोलावली बैठक

Sharad Pawar Maharashtra Today

मुंबई : राज्यात सुरु असलेल्या घडामोडीमुळे महाविकास आघाडी सरकार बॅकफूटवर आले आहे . यापार्श्वभूमीवर विरोधकही सरकारवर निशाणा साधत आहेत .

महाआघाडी सरकारमधील (MVA Goverment) वादग्रस्त प्रकरण आणि सरकारची मलिन होत असलेली प्रतिमा या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख मंत्र्यांची आणि नेत्यांची बैठक बोलावली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan case) प्रकरणापासून ते मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze arrest) अटकेपर्यंत या ना त्या मुद्यांमुळे महाविकास आघाडी सरकारला बॅकफूटवर जावे लागले आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीचे शिल्पकार असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची मुंबई महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

सचिन वझे, संजय राठोड, धनंजय मुंडे, अर्थसंकल्पीय अधिवेशनात सेना राष्ट्रवादीमध्ये झालेली रस्सीखेच या सर्व गोष्टींचा आढावा शरद पवार आजच्या बैठकीत घेणार आहेत. सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रात ही बैठक होणार आहे.

दरम्यान मुंबई स्फोटकांनी कार सापडल्या प्रकरणी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशी झाल्याशिवाय कारवाई करणार नाही अशी ठाम भूमिका घेत सचिन वाझे काय ओसामा बिन लादेन आहे का? असे विधान केले होते. मात्र, एनआयएने सचिन वाझे यांना अटक केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडले आहे. त्यामुळेच आता शरद पवार यांनी संकटमोचक म्हणून पुन्हा धावून आले आहेत .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER