राष्ट्रवादी सोलापुरात राजकीय भूकंप घडवण्याच्या तयारीत

Sharad Pawar

सोलापूर :- राज्याच्या सत्तेत एकत्र असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला धक्का देण्याच्या तयारीत आहे. सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजकीय भूकंप घडविला जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. सोलापूर महानगरपालिकेत विरोधी पक्षनेते असलेले शिवसेनेचे वरिष्ठ नगरसेवक महेश कोठे आणि एमआयएमचे नगरसेवक तौफिक शेख हे दोघेही राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कांही दिवसांपूर्वीच एमआयएमचे नेते तौफिक पाहिलवान यांनी पक्षाच्या नऊ नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती. तर शिवसेनेचे नेते महेश कोठे यांनी ही शरद पवारांची भेट घेतल्याने चर्चेला पेव फुटले आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षातील नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, जर सोलापूर शहर मध्य मधील हे दोन तगडे गडी राष्ट्रवादीच्या गळाला लागले तर शहरातील राष्ट्रवादीची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. मात्र शिवसेना नेते महेश कोठे यांनी अद्याप मी पवार साहेबांची भेट घेतली नाही विरोधकांकडून हेतुपुरस्पर अशा बातम्या पेरल्या जातं आहेत असं म्हटलं आहे. तर दुसरीकडे तौफिक पहिलवान हे राष्ट्रवादीमध्ये जाण्यासाठी अनुकूल असल्याचं सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळं येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूरमध्ये मोठा राजकीय भूकंप घडवून आणण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER