एमआयएमला मोठे खिंडार; पुण्यातील असंख्य पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Sharad Pawar - Asaduddin Owaisi

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi) स्थापन झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू झाले आहे. २०१४ नंतर भाजपमध्ये (BJP) झालेली मेगाभरती थांबली आहे.
तर, भाजपमधून गळती सुरू झाल्याचं दिसून येत आहे. तर, एआयएमआयएमसह (AIMIM) इतर पक्षातील स्थानिक नेतेदेखील राष्ट्रवादीने स्वतःच्या गळाला लावल्याचे दिसून आले होते.

अशातच, राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा एआयएमआयएमला खिंडार पाडलं आहे. पुणे शहरातील एमआयएम पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आमदार चेतन तुपे (Chetan Tupe) यांच्या पुढाकाराने गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुंबईतील पक्ष कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला आहे.

एमआयएमचे पुणे शहराध्यक्ष जुबेर बाबू शेख, मोसिन खान, तन्वीर शेख, इम्रान बागवान, जावेद मोमिन, साद शेख, सोहेल बागवान व पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादीची वाट धरली आहे. दरम्यान, मागील आठवड्यात सोलापूरमधील एआयएमआयएम पक्षाचे नेते तौफिक शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे ठरवले होते. याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री नवाब मलिक यांची भेटदेखील घेतली होती. त्यांच्यासह एआयएमआयएमचे सोलापूरमधील दहाच्या दहा नगरसेवकदेखील लवकरच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER