राष्ट्रवादीच्या पदाधिकारी खूनप्रकरणी पाच संशयित गजाआड

राष्ट्रवादी च्या पदाधिकारी खुनप्रकारणी पाच संशयित गजाआड

सांगली :- राष्ट्रवादीचे पदाधिकारी दत्तात्रय महादेव पाटोळे ( वाघमोडेनगर , कुपवाड ) खूनप्रकरणी पाच संशयितांना पोलिसांनी शनिवारी गजाआड केले. शुक्रवारी भरदिवसा युवक राष्ट्रवादीचे शहर जिल्हा उपाध्यक्ष पाटोळे यांचा पाठलाग करून कुपवाड एमआयडीसीत खून करण्यात आला होता. पाटोळे यांचा खून पूर्ववैमनस्यातून केल्याचे उघडकीस आणून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या पथकाने पाच जणांना अटक केली.

पाटोळे खूनप्रकरणी निलेश विठोबा गडदे ( वय- २१ , वाघमोडेनगर कुपवाड ) , सचिन अज्ञान चव्हाण ( वय २२, आर. पी. पाटील शाळेजवळ कुपवाड ) , वैभव विष्णु शेजाळ (वय २१ , विठुरायाचीवाडी, ता . कवठेमहकाळ, सध्या रा. वाघमोडेनगर), मृत्युजंय नारायण पाटोळे ( वय २७ , आंबा चौक, यशवंतनगर ), किरण शंकर लोखंडे ( वय १९, वाघमोडेनगर ) आदींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक पिंगळे यांनी दिली . संगनमताने पाठलाग करून गाडी आडवी मारून पाटोळे यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खून केल्याची कबुली संशयितांनी दिली आहे.

तपास पथकातील पोलीस नाईक सागर लवटे यांना खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की, मयत दत्तात्रय पाटोळे यांचा काही दिवसांपूर्वी  किरकोळ कारणावरून निलेश गडदे याच्याबरोबर वाद झाला होता. याच वादाचा राग मनात धरून निलेश गडदे आणि त्याच्या मित्रांनी मिळून हा खून  केला आहे. संबंधित संशयित जत तालुक्यातील जिरग्याळ येथील एका कुरणात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकाने छापा मारून त्यांना ताब्यात घेतले.

या सर्वांना कुपवाड एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, प्रदीप चौधरी, अभिजित सावंत. अंतम खाडे, शरद माळी, सहायक फौजदार सागर पाटील, जगन्नाथ पवार, बिरोबा नरळे ,सागर लवटे, निलेश कदम, जितेद्र जाधव, मेघराज रुपनर, अरुण औताडे, अमित परिट, सुधीर गोरे, संदिप गुरव, अनिल कोळेकर, शशिकांत जाधव, सुनील लोखंडे, मुदसर पाथरवट, आमसिद्धा खोत, राजू शिरोळकर, राजू मुळे, संजय पाटील, सचिन कणप, वैभव पाटील, विकास भोसले, संजय कांबळे, सुहेल कार्तीयांनी, अजय बेंद्रे, सचिन सूर्यवंशी, अरुण सोकटे, स्वप्नील नायकोडे, सुवर्णा देसाई, प्रशांत माळी, आर्यन देशिंगकर, हृषीकेश सदामते, गौतम कांबळे यांच्या पथकाने यशस्वी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER