राष्ट्रवादी चे पदाधिकारी पाटोळे खून प्रकरणी पाच जणांना आठ दिवसाची पोलीस कोठडी

Dattatraya Patole - Five Arrested

सांगली :- कुपवाडमधील वाघमोडेनगर येथील दत्तात्रय पाटोळे खून प्रकरणी अटकेत असलेल्या पाच जणांना कोर्टाने दि.20 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत धाडले आहे.

वाघमोडेनगरमध्ये राहणारे आणि युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून कार्यरत असलेले दत्तात्रय पाटोळे यांचा पाठलाग करुन शुक्रवारी खून करण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणी संशयीत निलेश विठोबा गडदे (वय 21, वाघमोडेनगर कुपवाड), सचिन अज्ञान चव्हाण (वय 22 , आर. पी. पाटील शाळेजवळ कुपवाड) , वैभव विष्णु शेजाळ (वय 21, विठुरायाचीवाडी, ता . कवठेमहकाळ, सध्या रा. वाघमोडेनगर), मृत्युजंय नारायण पाटोळे (वय 27, आंबा चौक, यशवंतनगर), किरण शंकर लोखंडे (वय 19, वाघमोडेनगर) आदींना शनिवारी अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरुध्द संगनमताने पाठलाग करून गाडी आडवी मारून पाटोळे यांच्या डोकीत, शरीरावर धारदार शस्त्राने वार करुन त्यांचा खून केल्याप्रकरणी संशयीतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक निरज उबाळे हे करत आहेत. त्यांनी काल सर्व संशयीतांना कोर्टासमोर हजर केले. कोर्टाने पाचही जणांची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER