‘भाजप नेते संजय काकडेंवर तुरूंगात जायची वेळ आली’, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे विधान

Sanjay Kakade-Nawab Malik

मुंबई : भाजपचे माजी खासदार आणि प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे (Sanjay Kakade) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत (Uddhav Thackeray) मोठं विधान केलं आहे. मी उद्धव ठाकरेंना चांगलं ओळखतो. त्यांची महाविकास आघाडीत घुसमट होत आहे. आज ना उद्या ते नक्कीच आघाडीतून बाहेर पडतील, असं मोठं विधान संजय काकडे यांनी केलं आहे. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी संजय काकडेंना जोरदार प्रत्युत्तर दिले. संजय काकडे म्हणतात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आघाडीतील नेत्यांचा दबाव आहे. मात्र आता काकडेंवर तुरुंगात जायची वेळ आली आहे. त्यामुळे अशा प्रकारे ते विधान करत आहेत. सत्तेचा वापर करून जे धंदे करत होते आता त्यांनी आपले तोंड बंद ठेवावं. आमचं सरकार आशा लोकांना महत्त्व देत नाही, असा खरमरीत टोला मलिक (Nawab Malik) यांनी लगावला.

मलिक यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, कोरोनाचं संकट मोठं आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सर्व पक्षीय बैठक बोलवा. त्यातून मार्ग काढा. पंतप्रधान नरेंद्र मोदी एकटे कोरोनाशी लढू शकत नाही, भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनीही हीच मागणी केली आहे. आधी विरोधक जे बोलत होते, तेच आता स्वामी बोलत आहेत. ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा देखील तुडवडा आहे, मोदींच काहीच नियोजन नाही. आधी अधिकार घेतले आणि परिस्थिती हाताबाहेर जात असताना आता मात्र केंद्र सरकार जबाबदारी झटकत आहे. सर्वपक्षीय बैठक बोलवून निर्णय घेण्याची गरज आहे, मोदी एकटे कोरोनाशी लढू शकत नाही, असं मलिक म्हणाले.

पॉझिटिव्ह रेट आता केवळ गोवा नाही तर यूपीत देखील सारखाच आहे. रॅपिड अँटीजन टेस्ट केल्यावर हा रेट ६० टक्क्यांवर जातोय. जर आरटीपीसीआर चाचण्या केल्या तर काय होईल? असा प्रश्न उपस्थित करतानाच चाचण्या केल्या तर १० लाखपर्यत बाधितांची संख्या होईल. लाखो लोकांना प्राणाला मुकावे लागेल, अशी परिस्थिती आहे. माझी मागणी आहे. सर्व देशातील नेत्यांची बैठक मोदींनी बोलवावी आणि परिस्थिती समजून घ्यावी. विदेशातून सामान येत आहे. परंतु, त्याचे वाटप देखील होत नाही. आज ४००० लोकं मृत्यूमुखी पडत आहेत परिस्थिती आणखी बिकट होईल. केंद्राने मोठ्या प्रमाणत ऑक्सिजन कॉन्सट्रेटरची ऑर्डर द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

बंगालमध्ये सुरू असलेल्या हिंसेच कोणीही समर्थन करणार नाही. सध्या भाजप खोटे व्हिडीओ टाकून ममतादिदींना बदनाम करण्याचे षडयंत्र रचत आहे. भाजपचा पराभव झाला यावरुन लोकांचे लक्ष वळवण्यासाठी हे प्रकार सुरू आहेत. ममतादिदींविरोधात वातावरण निर्माण करण्यासाठी खोटे व्हिडीओ टाकले जात आहे, असेही मलिक म्हणाले. किसान सम्मान निधी देऊ अशी घोषणा भाजपने केली होती. आता ममतादिदींनी तत्काळ तो निधी देण्याची मागणी केली आहे. आता केंद्राची जबाबदारी आहे. त्यांनी प्रति शेतकरी १८ हजार रुपये द्यावेत. यासोबतच मोफत लसीकरण देखील करावं. भाजपनेच आश्वास दिलं आहे, त्यांनी आश्वासन पाळलं पाहिजे, असंही ते म्हणाले. टागोर यांची जयंती सर्वजण साजरी करत आहेत. टागोर जाती धर्माच्या पलीकडचे होते. मोदींनी हा लूक बंगाल निवडणुकीसाठी केला होता. आता त्यांनी त्यांचे विचार देखील आत्मसात केले पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.

मुंबईत १० हजारांपेक्षा जास्त क्षमतेचे कोव्हिडं सेंटर उभारली आहेत. अशीच तयारी आम्ही राज्यात करतोय. त्यामुळे आगामी संकटावर आम्ही मात करत आहात. १५०० मॅट्रिक टन ऑक्सिजन आम्ही निर्माण करत आहोत. यासोबतच ३०० मॅट्रीक टन ऑक्सिजन निर्माण होईल असे प्लांट काही दिवसांत सुरू होतील. आम्ही कोणतेही अधिकार मंत्र्यांकडे न ठेवता थेट जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. त्यामुळे आज मुंबई पॅटर्नची सर्वत्र चर्चा होत आहे, असंही त्यांनी सांगितलं. देशात नवीन संसद बांधण्याबाबत टीका होत होती. आज भाजपचे आमदार म्हणत आहेत मग मनोरा आमदार निवास का बांधत आहेत? देशात कोव्हिडसाठी आर्थिक गरज आहे, असं भाजपकडून सांगण्यात येतंय. मनोरा आमदार निवासाबाबत बोलणाऱ्यांनी हे काँन्ट्रॅक्ट फडणवीस सरकारनेच दिलं होतं हे लक्षात ठेवावं, असा टोलाही त्यांनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button