महाराष्ट्रालाही ‘तौक्ते’चा फटका, मग पंतप्रधानांचा भेदभाव का? राष्ट्रवादीच्या नेत्याचा सवाल

मुंबई :- ‘तौक्‍ते चक्रीवादळामुळे (Tauktae-Cyclone) गुजरात, गोवा आणि महाराष्ट्रात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गुजरात दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यावरून काँग्रेसपाठोपाठ आता राष्ट्रवादीनेही टीकास्त्र सोडले. महाराष्ट्रालाही तौक्ते वादळाचा फटका बसला, मग पंतप्रधानांचा भेदभाव का? असा सवाल राष्ट्रवादीने केला आहे.

नवाब मलिक (Nawab Malik) ट्विटमध्ये म्हणाले की, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी तौक्ते वादळाने नुकसान झालेल्या दीव-दमण आणि गुजरातचा हवाई दौरा करणार आहेत. महाराष्ट्रात तौक्ते वादळ येऊन नुकसान करून गेले आहे. मग महाराष्ट्राचा दौरा पंतप्रधान का करत नाहीत? महाराष्ट्राबाबतचा हा भेदभाव नाही का? असा सवाल मलिक यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button