लॉकडाऊनविषयी राज्यांना सल्ला देणाऱ्या पंतप्रधानांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Today

मुंबई : देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राज्यांना लॉकडाउनकडे (Lockdown) अंतिम पर्याय म्हणून पाहण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने(NCP) मोदींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना कोर्टच लॉकडाउनचा आदेश देत असल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधानांनी राज्यांना लॉकडाउन हा शेवटचा पर्याय असावा असे सांगितले आहे. पण देशातील अनेक कोर्ट लॉकडाउनचा आदेश देत आहेत. पंतप्रधान स्थलांतरित मजूर, गरीब आणि छोट्या उद्योजकांसाठी मदत निधी जाहीर करतील अशी लोकांना अपेक्षा होती,’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक(Nawab Malik) यांनी एका वृत्तसंस्थेला बोलताना म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री ८.४५ वाजता देशाला उद्देशून भाषण केले. यावेळी त्यांनी देशातील करोनास्थिती, लसीकरण मोहीम आणि अन्य उपाययोजनांबाबत भाष्य केले. ‘देश करोनाशी मोठी लढाई लढत आहे. गेल्या वर्षाअखेर परिस्थितीत सुधारणा होत असल्याचे चित्र दिसत होते. मात्र, दुसरी लाट मोठी असून, सरकार तिचा पूर्ण सामर्थ्याने सामना करत आहे. आव्हान मोठे असले तरी निर्धार, धाडस आणि तयारीने संकटावर मात केली पाहिजे’, असे सांगत मोदी यांनी सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button