अखेर राष्ट्रवादीचे ठरले ; अनिल देशमुखांच्या राजीनाम्यासंदर्भात भूमिका स्पष्ट

Maharashtra Today

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (parambir-singh)यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे महाविकास आघाडी सरकारची डोकेदुखी वाढली आहे . . अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा यासाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीने मात्र जोपर्यंत तपास पूर्ण होऊन सत्य समोर येत नाही तोपर्यंत राजीनामा न घेण्याची भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik)यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या आरोपांना उत्तर देत पक्षाची भूमिका मांडली.

. अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा यासाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीने मात्र जोपर्यंत तपास पूर्ण होऊन सत्य समोर येत नाही तोपर्यंत राजीनामा न घेण्याची भूमिका घेतली आहे. यावेळी नवाब मलिक यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आरोपांना उत्तर देत पक्षाची भूमिका मांडली.

शरद पवारांनी काहीतरी शिजल्यानंतर हे आरोप होत असल्याचं सांगितलं आहे. तपास होऊ द्या, जे सत्य आहे त्यापद्धतीने पुढील कारवाई होईल. सध्या राजीनामा घेण्याची गरज नाही अशी स्पष्ट भूमिका पक्षाने घेतली आहे. आरोप गंभीर असले तरी सत्य आहेत की नाही तपासणं गरजेचं आहे. पत्राबाबत शंका असून तपास पूर्ण होईपर्यंत कोणतीही कारवाई होणार नाही”.

परमबीर सिंह यांनी बदली झाल्यानंतर पत्र लिहिले आहे. कुठेतरी जाणुनबुजून हा पुरावा तयार करण्यात आला असं दिसत आहे. पत्रात तारखांचा जो उल्लेख आहे त्याबद्दल बोलायचं गेल्यास अनिल देशमुख फेब्रुवारीच्या सुरुवातीला जनसंवाद यात्रेत होते. त्यानंतर करोना पॉझिटिव्ह झाल्यामुळे १५ तारखेपर्यंत रुग्णालयात होते. त्यानंतर २७ तारखेपर्यंत क्वारंटाइन असताना कोणाला भेटले नाहीत. अनिल देशमुख वाझेंना फेब्रुवारी अखेरला भेटले असं परमबीर सिंह सांगत आहेत,असे नवाब मलिक म्हणाले आहेत.

यासंबंधी तपास होणं गरजेचं आहे. आरोपांमध्ये सत्य किती आहे याची माहिती घेतल्याशिवाय राजीनामा द्या अशी मागणी करणं सोपं आहे. पण बिनबुडाचे आरोप कोणीही करु शकतो. त्यासाठी पक्षाने निष्पक्ष भूमिका घेतली आहे. तपास होईल, त्यानंतर सत्य समोर येईल आणि मग कारवाई केली जाईल.

या राज्याने अनेक मुख्यमंत्र्यांना छोट्या चुकांसाठी घरी पाठवलं आहे असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. यावर बोलताना नवाब मलिक म्हणाले की, “कालपर्यंत मोठी चूक वाटत होती आणि आता छोटी चूक म्हणत आहे, म्हणजे कुठेतरी भाजपाला यामध्ये काही तथ्य निघणार नाही असे दिसत आहे .

ही बातमी पण वाचा : परमबीर सिंहांच्या ‘लेटरबॉम्ब’नंतर काँग्रेस हायकमांड ‘अ‍ॅक्टिव्ह’ 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER