सात वर्षात फक्त स्वप्ने दाखवले, पण पूर्तता केली नाही; राष्ट्रवादीची मोदींवर टीका

PM Narendra Modi - Nawab Malik

मुंबई :- केंद्रातील मोदी सरकारने सात वर्षात केलेल्या कारभाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी काँग्रेसने देशभरात आंदोलने केली. तर राष्ट्रवादीने निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गेल्या सात वर्षात लोकांनी जे जे स्वप्ने दाखवली त्यातल्या एकाही गोष्टीची पूर्तता केली नाही, अशी टीका राष्ट्रवादीने केली. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ट्विट करून ही टीका केली आहे.

सात वर्षात महागाई कमी झाली नाही… पेट्रोलचे दर कमी झाले नाहीत… लोकांच्या खात्यात 15 लाख रुपये आले नाहीत… दरवर्षी 2 कोटी लोकांना रोजगार देण्याचे जाहीर केले, त्यापैकी कुणालाच रोजगार मिळाला नाही… मोदींनी जी जी स्वप्ने दाखवली त्यातील एकपण पूर्ण केले नाही. सात वर्षात देशात गरीब गरीबच राहिला. बेरोजगारी वाढली. महागाई जास्त झाली. भाजपच्या सात वर्षाच्या राजवटीत सामान्य लोकांच्या जीवनात कोणताच बदल झाला नाही ही सत्य परिस्थिती आहे, असा आरोपही त्यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन टर्म आणि केंद्र सरकारने सात वर्षे पूर्ण केली आहेत. मोदी दुसऱ्या टर्ममध्ये कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले आहेत. वेळेत निर्णय घेण्यात आले नाहीत. कोट्यवधी लोक रोजगाराला मुकले. काही लोक बेरोजगार झाले. कित्येक लोकांना अर्ध्या पगारावर काम करावे लागले. अर्थव्यवस्था अक्षरशः चौपट आहे. यापेक्षा मोदी सरकारची नाकामी असूच शकत नाही. वेळेत ज्या वस्तूंची आवश्यकता होती त्यावरही योग्य निर्णय घेतला नसल्याने कोट्यवधी लोक कोरोना बाधित झाले. तर लाखो लोकांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची घटना घडली, असं मलिक म्हणाले.

ही बातमी पण वाचा : ओबीसी आरक्षणावर महाविकास आघाडी सरकार लवकरच तोडगा काढेल – नवाब मलिक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button