अनिल देशमुखांना बदनाम करण्यासाठी कारस्थान, सत्तेचा वापर करुन गुन्हा दाखल : राष्ट्रवादीची प्रतिक्रिया

ncp-nawab-malik-comment-on-anil-deshmukh-ed-files

मुंबई : राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर ईडीने (ED) ने गुन्हा दाखल केला आहे. ईडीने दाखल केलेला गुन्हा हे सगळं राजकीय हेतूने आणि सत्तेचा वापर करून त्यांना बदनाम करण्यासाठी कारस्थान सुरू आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी यांनी व्यक्त केली आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग (Param Bir Singh) यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. याप्रकरणात न्यायालयाने सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर आता ईडीने गुन्हा दाखल केला आहे. हे सगळे त्यांना बदनाम करण्यासाठी कारस्थान सुरू आहे, असे नवाब मलिक यांनी सांगितले.

केंद्रातील भाजप सरकार सर्व केंद्रीय एजन्सींचा वापर करून राजकारण करतेय हे स्पष्ट आहे. त्याच पद्धतीने ईडीने गुन्हा दाखल केला आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.

हा गुन्हा राजकीय हेतूने आणि आघाडी सरकारला, पक्षाला बदनाम करण्यासाठी दाखल करण्यात आला आहे. त्यांनी ज्या काही कायदेशीर बाबी असतील त्या तपासाला अनिल देशमुख सहकार्य करतील, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button