‘कोणीही यावं आणि मन मोकळं करावं!’ खडसेंबाबत सुप्रिया सुळेंचे सूचक विधान

Supriya Sule-Jayant Patil.jpg

पुणे :- भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या संभाव्य राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल दोन्ही पक्षांतील नेत्यांनी अद्याप कुठलेही स्पष्टीकरण दिलेले नाही. आधी भाजप खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांनी खडसेकाकांच्या पक्षांतराचा चेंडू त्यांच्या सूनबाई – खासदार रक्षा खडसेंकडे टोलवला होता, आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे बोट दाखवलं आहे.

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारा, असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी सविस्तर बोलण्याचं टाळलं. मात्र पवार कुटुंबीयांवर टीका केल्याशिवाय हेडलाइन्स होत नाहीत, कोणीही यावं आणि मन मोकळं करावं, आम्ही दिलदार आहोत, असे सूचक विधानही त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना उद्देशून केले. दरम्यान, पुण्यामध्ये गेल्या दोन वर्षांपासून पूरपरिस्थिती निर्माण होत आहे.

त्यामुळे याला आम्ही जबाबदार असल्याच्या आरोपात कुठलेही तथ्य नाही. पुण्यातील पुरास कारणीभूत ठरलेल्या अंबिल ओढ्याची  वर्क ऑर्डर दोन दिवसांत काढणार, लवकरच हा विषय मार्गी लागणार, असे आश्वासनही त्यांनी दिले. सुरक्षा भिंत दोन वर्षांपूर्वी पडली आणि अजूनही त्याचं काम पूर्ण झालं नाही. तर यामध्ये २५ वर्षांचा हिशेब कसा होऊ शकतो? असा प्रतिप्रश्न उपस्थित करत टीका करावी पण कामही करावं, असा टोला सुळेंनी महापौर मुरलीधर मोहोळ यांना लगावला. अतिवृष्टिग्रस्तांना केंद्राकडून मदतीसाठी पंतप्रधानांकडे प्रयत्न करू, असंही त्या म्हणाल्या.

ही बातमी पण वाचा : खडसेंच्या संभाव्य पक्षप्रवेशावर अजित पवारांनी मौन सोडले, म्हणाले…

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER