सुप्रिया सुळेंकडून मोदींच्या ‘त्या’ दोन मंत्र्यांचे कौतुक

Supriya Sule

मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांचे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) आज संसदेत कौतुक केले. त्यामुळे सभागृहात अनेकांच्या भुवया उंचावल्या. ‘निर्मला सीतारामन यांचं मंत्रालय नेहमी इतर विभागांपेक्षा चांगली कामगिरी करतं. आमचे त्यांच्याशी मतभेद असू शकतात.

पण मला अर्थमंत्री आणि अर्थ राज्यमंत्री यांच्या कामाचं कौतुक करावंसं वाटतं . ते सातत्यानं विधेयकं सादर करून परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत.’ अशा शब्दांत सुळेंनी अर्थमंत्री सीतारामन आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांचे कौतुक केले. दरम्यान राज्यसभेत कृषी विधेयकांवरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षाच्या खासदारांकडून वेलमध्ये उतरून घोषणाबाजी करण्यात आली. नियम पुस्तिका फाडण्याचाही प्रयत्न करण्यात आला.

यानंतर आठ खासदारांचे निलंबन करण्यात आले. या कारवाई विरोधात खासदारांनी रात्रभर संसद परिसरात आंदोलन केले. यावेळी सुप्रिया सुळे संसदेबाहेर सरकारविरोधी निदर्शनांमध्ये सहभागी झाल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER