रायगड संवर्धनाचं काम का रखडलं हे माझ्यापेक्षा संभाजीराजेंना विचारलेलं बरं

Amol Kolhe - Raigad - Sambhaji Raje

पुणे :- आज लोकांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन आहे. दरवर्षी लाखो समुदायाच्या उपस्थितीत रायगडावर हा सोहळा पार पडतो. मात्र, यंदा कोरोनाच्या सावटामुळे रायगडावर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला.

अनेक वर्षांपासून रायगडाचा विकास रखडला आहे. रायगडाच्या संवर्धनाबाबत खासदार अमोल कोल्हे यांना माध्यमांनी प्रश्न केल्यानंतर त्यांनी संभाजी महाराजांकडे बोट दाखवले आहे.

“रायगडाच्या संवर्धनाचं काम का रखडलं आहे हा प्रश्न माझ्यापेक्षा खासदार संभाजीराजेंना विचारलेला बरा. माझ्या माहितीप्रमाणे काही प्रमाणात काम झालंय पण रायगड १७ व्या शतकात जसा होता तसा बघायला सगळ्यांना आवडेल. ते जगातील आठवं आश्चर्य असेल. ” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले.

कोरोनामुळे शिवराज्याभिषेक दिन मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरा करावा लागतोय. आजच्या दिवशी लोकांचे राज्य आले होते. ख-या अर्थाने हा लोकांचा उत्सव आहे, असं खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले. टीव्ही-९ सोबत ते पुण्यात बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER