खासदार अमोल कोल्हेंनी कोव्हिड टेस्टसाठी उपकरण दिले भेट

Amol Kolhe-Covid Equipment

मुंबई : राज्यात कोरोनाचे (Corona) संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . यापार्श्वभूमीवर शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे (Amol Kolhe) व जगदंबा प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या माध्यमातून डॉक्टर कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अनावश्यक खर्च टाळून नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालय कोव्हिड केअर सेंटरला “हाय फ्लो नोझल ऑक्सिजन” (High flow nozzle oxygen) हे उपकरण भेट देण्यात आले आहे.

कोल्हे यांनी भेट केलेले उपकरण रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असून ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी असणाऱ्या रुग्णांसाठी याचा अधिक फायदा होणार आहे. या उपकरणाचं वैशिष्ट्य म्हणजे एकाच वेळी रुग्णांची 24 मोफत तपासणी करण्यात येणार आहे. ग्रामीण रुग्णालयाचे वैधकीय अधिकारी डॉक्टर योगेश आगम, डॉक्टर मिलिंद घोरपडे ,डॉक्टर अभिजीत काळे, यांच्याकडे जगदंब प्रतिष्ठानचे प्रतिनिधी सागर रामसिंग कोल्हे यांच्यातर्फे सुपूर्द करण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER