राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना कोरोनाची लागण

Amol Mitkari

अकोला :- राज्यात कोरोनाचे संकट (Corona Crises) दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. आतापर्यंत अनेक राजकीय नेतेही कोरोनाच्या विळख्यात सापडले .

विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांना कोरोनाची लागण (Covid19-positive) झाली आहे. आपला कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून, तब्येत चांगली असल्याचे त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे .

‘सकाळी थोडा ताप जाणवू लागल्यामुळे मी कोरोना चाचणी केली. ती पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच औषधोपचार घेत आहे. संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन मिटकरी यांनी केले. सर्वांच्या आशीर्वादाने लवकरच जनसेवेत रुजू होईल, असेही ते म्हणाले .

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत आमदार मिटकरी यांनी मोठ्या प्रमाणात बैठका, सभा घेतल्या. दोन दिवसांत मिटकरी यांनी जवळपास २० पेक्षा जास्त, राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या. या सभेदरम्यान त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे मोठे नेतेदेखील होते. रोहित पवार हेदेखील होते. या दोन दिवसांत मिटकरी हजारो कार्यकर्त्यांच्या संपर्कात आले असल्याची माहिती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button