राकाँच्या आमदाराचे जात प्रमाणपत्र बोगस; शिवसेनेच्या उमेदवाराच्या मुलाचा आरोप

Shivsena & NCP

सोलापूर : मोहोळ विधानसभा राखीव मतदारसंघाचे आमदार यशवंत माने यांचे दोन जातीचे दाखले असून त्यांनी जातीचा बोगस दाखला काढून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप शिवसेना उमेदवाराचे पुत्र सोमेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत केला. याबाबत त्यांनी आमदार यशवंत माने यांचे दोन्ही दाखले सादर केले.

बुलडाणा जिल्ह्यात कैकाडी समाज हा SC मध्ये गणला जातो. यशवंत माने यांच्याकडे तेथील SC चे जात प्रमाणपत्र आहे. पुणे जिल्ह्यात कैकाडी समाज हा VJ विमुक्त वर्गात येतो. आमदार माने हे मागील १०० वर्षापासून इंदापूर तालुक्यात राहत असून त्यांनी बुलडाण्यातून SC वर्गाचा जातीचा दाखला दाखल करुन निवडणूक आयोगाची फसवणूक केली, असा आरोप आहे.

आमदार माने यांचा कैकाडी समाजाचा इंदापूरमधील शेळगावचा दाखला हा VJ विमुक्त वर्गातील असून १९८५ साली त्यांनी हा दाखला काढला होता तर बुलडाणा जिल्ह्यातील चिखलीमधून त्यांनी SC चा दाखला काढून त्यावर मोहोळ विधानसभा मतदारसंघातील निवडणूक लढवल्याचा आरोप सोमेश क्षीरसागर यांनी केला.

बुलडाणा जातपडताळणी कार्यालयाकडे याबाबत तक्रार दाखल केली असून मोहोळ पोलिस स्टेशनमध्ये देखील फिर्याद दिली आहे, असे सोमेश क्षीरसागर यांनी सांगितले.

या आरोपाबाबत आमदार यशवंत माने म्हणाले की, क्षीरसागर यांनी केलेल्या आरोपाबद्दल मला फार काही बोलायचे नाही. मी यावर काही प्रतिक्रिया देणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER