राष्ट्रवादीचा आमदार अन् पुतण्यामधील प्रकरण ; हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याची होती योजना

NCP MLA - Maharastra Today

मुंबई : पुणे जिल्ह्यातील खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा डाव उघडकीस आल्याची माहिती समोर आली आहे . या प्रकरणात आमदारांचा निकटवर्तीय आणि भावकीतील शैलेश मोहिते पाटील याचे नाव आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सातारा पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2009 साली दिलीप मोहिते पाटील विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर 2014 ला त्यांना पराभव पत्करावा लागला. यावेळी शैलेश मोहिते पाटील याने दिलीप मोहिते यांचा प्रचाराची सूत्रे सांभाळली होती. त्यानंतर दिलीप मोहिते-पाटील आणि शैलेश मोहिते यांच्यामध्ये काही कारणाने मतभेद झाले आणि त्यांचा वाद टोकाला गेला.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत दिलीप मोहिते पाटील हे विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेल्याने शैलेश मोहिते पाटील नाराज होता. त्याच्याकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं सरचिटणीस पद आहे व त्याने स्वतः आमदार होण्यासाठी चारही बाजूंनी प्रयत्न करत असल्याचे समोर येत आहे. राजकारणात कधी काय होईल आणि कोण कधी काय करेल हे सांगता येत नाही, असेच काहीसे या प्रकरणात घडले . आमदारकी मिळवण्यासाठी हे हनी ट्रॅप प्रकरण करून दिलीप मोहिते यांना बदनाम करण्याचा कट शैलेशने रचला नाही ना?, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button