आर. आर. पाटील यांच्या घरात तिघांना कोरोना; आता आमदार सुमन पाटील कोरोनाबाधित

Suman Patil - Corona Positive

सांगली : राज्यात कोरोनाचे (Corona) संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अनेक राजकीय नेतेही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. सांगली (Sangli) जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक सुरूच आहे. आर. आर. पाटील (आबा) (R.R Patil) यांचे सुपुत्र रोहित पाटील (Rohit Patil) यांच्यापाठोपाठ आबांची पत्नी अर्थात राष्ट्रवादीच्या (NCP) आमदार सुमन पाटीलही (Suman Patil) कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत.

सुमन पाटील या राष्ट्रवादीकडून तासगाव – कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. त्यांचे पुत्र रोहित पाटील आणि दीर सुरेश पाटील या दोघांचे कोरोना अहवाल गुरुवारी दुपारी पॉझिटिव्ह आले होते. त्यावेळी सुमनताई पाटील यांची स्वॅब तपासणी केली असता त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र काल (शनिवारी) रात्री उशिरा आलेल्या त्यांच्या अहवालात कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER