राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे लग्नबंधनात ; शरद पवारांनी दिले शुभाशीर्वाद

Saroj Ahire - Sharad Pawar

देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire) व नाशिक मधील दंतरोगतज्ञ डॉ.प्रवीण वाघ यांच्या विवाह सोहळा आज नाशिक (Nashik) येथे पार पडला. नाशिक तालुक्यातील अलास्का बँक्वेट हॉलमध्ये आज पार पडतो आहे .

या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पार्टीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar), राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), आमदार दिलीप बनकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजी खासदार देविदास पिंगळे, आमदार दिलीप बनकर,आमदार नितीन पवार, आमदार हिरामण खोसकर यांनी उपस्थित राहून वधू वरांना शुभ आशीर्वाद दिले.

आमदार सरोज अहिरे यांच्या विवाह सोहळ्याला राष्ट्रवादीचे ,सर्वोसर्वा शरद पवार, ज्येष्ठ नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी हजेरी लावली आहे. तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील पुण्याची बैठक आटपून विवाहाला उपस्थित राहिले आहेत.

अतिशय मोजक्या मंडळींच्या आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्त मंडळींना आमंत्रण न देता आप्तेप्ट, घरातील मंडळी, मोजके नातेवाईक आणि प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER