शिवसेनेने राष्ट्रवादीला दिलेला शब्द पाळला; आमदाराने मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

Sangram Jagtap - CM Uddhav Thackeray

अहमदनगर : अहमदनगर (Ahmednagar) महापालिकेत स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीचा पेच अखेर सुटला आहे. शिवसेनेने (Shiv Sena) दिलेला शब्द पाळल्याने भाजपमधून (BJP) कालच राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या मनोज कोतकर यांची स्थायी सभापतिपदी निवड झाली आहे. निवडणुकीत दिलेल्या पाठिंब्याबद्दल राष्ट्रवादीचे (NCP) आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे पत्र लिहून आभार मानले आहे.

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), शिवसेना (Shiv Sena) सचिव मिलिंद नार्वेकर, मंत्री शंकरराव गडाख यांच्या चर्चेतून योग्य निर्णय झाला. चर्चेप्रमाणे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्र बसून हा निर्णय घेतला आहे. अहमदनगरच्या राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी मिळून शब्द पाळला आहे.’ असे पत्र राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी लिहिले आहे.

अहमदनगरचे स्थानिक राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, शशिकांत गाडे यांनीही याबाबत सकारात्मक भूमिका घेतली. यापुढचे निर्णय उद्धव ठाकरे आणि अजित पवार एकत्र बसून घेतील. त्याला आमच्या आणि सेनेच्या कार्यकर्त्यांची मान्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळला आणि त्यांचा निरोप मिलिंद नार्वेकर यांचं अजित पवारांशी बोलणं झाल्याप्रमाणे आम्हाला मिळाला’ असेही संग्राम जगताप यांनी लिहिले आहे.

अहमदनगर महापालिकेत शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष अंतर्गत वाद मिटवून एकत्र आले. अहमदनगर पालिकेच्या स्थायी समितीची निवडणूक दोन्ही पक्ष आता एकत्र लढवणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा झाल्यानंतर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी मध्यस्थीची भूमिका बजावली. स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांना एकत्र आणण्याची भूमिका बजावली. शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यातही याबाबत चर्चा घडवून नगरमधील अंतर्गत वादाला पूर्णविराम दिला.

आज अहमदनगर महापालिकेची स्थायी सभापतिपदाची निवडणूक पार पडली. महापालिकेच्या स्थायी सभापतिपदी राष्ट्रवादीचे मनोज कोतकर यांची निवड झाली आहे. सभापतिपदाच्या निवडणुकीत ऐनवेळी शिवसेनेचे योगिराज गाडे यांनी माघार घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER