भाजपचे काही नगरसेवक आमच्या संपर्कात; राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा

BJP-NCP

अहमदनगर :- महापौरपदाची निवडणूक येत्या काही महिन्यांत होत आहे. त्यामुळे नगर शहरातील राजकीय घडामोडींना वेग येऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगरला भाजपचे (BJP) आणखी काही नगरसेवक आमच्या संपर्कात असून, तेदेखील येत्या काळात आमच्यात येतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap ) यांनी केला. महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी राष्ट्रवादीचे मनोज कोतकर (Manoj Kotkar) यांची बिनविरोध निवड झाली.

शिवसेनेचे योगिराज गाडे यांनी उमेदवारी अर्ज पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार मागे घेतला. सभापतिपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने माघार घेतल्याने कोतकर बिनविरोध निवडून आले. यावरही जगताप यांनी भाष्य केले. स्थायी समितीच्या सभापतीसंदर्भात वरिष्ठ पातळीवर हा निर्णय झाला असून त्यात कोणतीही अडचण राहिली नाही, असंही संग्राम जगताप यांनी सांगतिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER