
करमाळा :- करमाळा तालुक्यातील केडगाव शिवारात ऊसतोड मजुराच्या मुलीचा बिबट्याने जीव घेतल्यानंतर गावात दहशतीचं वातावरण आहे. या बिबट्याला जेरबंद करण्यास वन विभाग अथक अपयशी ठरले.
तर येत्या दोन दिवसांमध्ये बिबट्याला पकडण्याचा निर्धार वन विभागाच्या अधिकार्यांनी केलाय. दरम्यान आता कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी स्वतः यामध्ये लक्ष घातले. पवार यांनी बॅटरी व काठी घेऊन वन अधिकारी यांच्याबरोबर पाहणी केली.
यावेळी, बिबट्याचे संकट टाळण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्राणाची शिकस्त करून हा बिबट्या जेरबंद करावा अशा सूचना रोहित पवारांनी दिल्यात. करमाळा तालुक्यातील वांगी सांगवी या ठिकाणी रोहित पवारांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. तसंच पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी करत असलेल्या कामाची माहिती घेतली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला