अमेरिकेत झाले , आता बिहारमध्ये अपेक्षा; रोहित पवारांचे ट्रम्प यांच्या पराभवानंतर ट्विट

Joe Biden - Rohit Pawar

मुंबई : अमेरिकेत झालेल्या सत्ता बदलाची तुलना बिहार निवडणुकीशी (Bihar Elections) करीत राष्ट्रवादीचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी बिहारमध्येही असाच बदल अपेक्षित असल्याचे म्हटले आहे.

‘बिहारमध्ये विरोधकांसाठी टाकलेल्या जाळ्यात भाजपप्रणित एनडीए स्वतःच गुरफटल्याचं एक्सिट पोलवरून दिसतंय. याचाच अर्थ सकारात्मक राजकारण सोडून दुसऱ्याला पाडण्यासाठी खड्डा खोदला तर त्यात आधी स्वतःचाच पाय अडकतो, याचा अनुभव भाजप घेतोय. त्यामुळं आता यातून तरी भाजपने काहीतरी बोध घ्यावा, असा सल्ला रोहित पवार यांनी दिला आहे.

त्या आधी अमेरिकेतील निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यात विजयी झालेल्याबद्दल बायडन यांचं पवार यांनी अभिनंदन केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ‘अमेरिकेतील हेकखोर सरकारविरोधातील हा विजय असून अमेरिकन मतदारांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणलेला हा नवा बदल आहे. असाच बदल बिहारच्या निकालातही दिसेल, अशी अपेक्षा, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER