लॉकडाऊन उठवा!; राष्ट्रवादीच्या आमदाराने केली ‘ही’ सर्वात मोठी मागणी

Rohit Pawar

नगर : कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये (Lockdown) सवलती देण्यासंबंधी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी यापूर्वी वेळोवेळी विविध मागण्या केल्या होत्या. त्यातील बहुतांश मागण्या यथावकाश पूर्णही झाल्या. आता त्याही पुढे जात संपूर्ण लॉकाडाऊन उठवण्याचीच मागणी पवार यांनी केली आहे .

सरकारने सिनेमागृह, नाट्यगृह, योगा, जलतरण तलाव खुले करण्याचा निर्णय आता लागू केला. ही मागणीही पवार यांनी केली होती. ती आता पूर्ण होत असताना पवार यांनी नवी मोठी मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘सिनेमागृह व नाट्यगृह सुरु झाल्यानंतर आता संपूर्णपणे लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय घेण्यात यावा. मात्र, त्यासोबतच नागरिकांनी देखील कायदा-सुव्यवस्थेचं पालन करावं आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून मास्कचा वापर करत स्वतःची काळजी घ्यावी, असे रोहित पवार म्हणाले आहेत .

दरम्यान लॉकडाऊन शिथील केले जाऊ लागले असताना विरोधकांसोबतच सत्ताधारी पक्षातील नेतेही विविध मागण्या करत आहेत. त्यामध्ये रोहित पवारही आघाडीवर आहेत. विविध क्षेत्रातील लोक पवार यांना भेटून लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या अडचणी मांडत आहेत. त्यातील काही मागण्या पवार सोशल मीडियातून अगर संबंधित मंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून मांडत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER